कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांच्या पोस्टर प्रकरणी नवीन घडामोडी समोर आल्या आहेत. पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या रमेश टिके या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, पोलिसांच्या दबावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. राजकीय वैमनस्यातून खोटा गुन्हा दाखल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याचे म्हटले आहे.