कल्याण पश्चिम येथील भाजप माजी आमदार नरेंद्र पवारांवर पैशांचा वर्षाव करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. विरोधकांकडून सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर पवार यांनी 'हळदीचा कार्यक्रम होता, माझ्या बाजूला गायक असून तो गाणी म्हणत होता म्हणून गायकावर पैसे उडवले असं स्पष्टीकरण दिलं आहे.