कल्याण रेल्वे स्थानकावर RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. २८ एप्रिल रोजी सायंकाळी धावत्या ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षीय बाळाला RPF चे सहायक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत सुरक्षित वाचवले.