कोळसेवाडी ते तिकीटघर गाठण्यासाठी चक्क दुचाकीचा वापर करण्यात आला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याण पूर्वेतील स्कायवॉकवर दुचाकी चालवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोळसेवाडी ते तिकीटघर अंतर वरील पायपीट वाचवण्यासाठी दुचाकी थेट स्कायवॉकवरच दामटण्यात आली. केवळ चालण्यासाठी असलेल्या स्कायवॉकवर अचानक दुचाकी आल्याने चालणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण दिसले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.