कल्याण शहरातील वाहतूक कोंडी ही नवी समस्या नाही; पण गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यावरील विकासकामे, मेट्रोचे काम, उड्डाणपुलांचे काम, पाइपलाइनच्या दुरुस्ती यामुळे शहरातील प्रमुख मार्ग जवळपास दररोज ठप्प होतात.या सततच्या कोंडीचा त्रास वाहनचालकांपासून रुग्णवाहिकांपर्यंत, शालेय बसपासून सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत सगळ्यांनाच सहन करावा लागतो. अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची अनुपस्थितीही जाणवते. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असतानाच सोशल मीडियावर एक धक्कादायक पण विचार करायला लावणारा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आहे. वाहतूक कोंडी पाहत तो चालकांना “काका पुढे चला… इकडे घ्या गाडी…” असं सांगत ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.