कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार करण्यात आली आहे. ४४८ कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा साकारली आहे. ही कलाकृती समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देत असून कलमांनी रेखाटलेल्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा होत आहे.