कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंगना रणौत यांचे गटारीत बसलेले पोस्टर हातात घेत पोस्टर फाडत पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कंगना रणौत यांना ठाणे जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, तसेच गरज पडल्यास शाईफेक आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.