कल्याणच्या तीसगावमधील पूर्व नाका परिसरात रेबीजच्या भीतीपोटी एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयएस अमीन असे या तरुणाचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. रेबीजच्या लक्षणांच्या भीतीमुळे तो प्रचंड भयभीत झाला होता आणि त्याने सुसाइड नोटमध्ये याचे कारण नमूद केले आहे.