अधिक ज्येष्ठ कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल दर्शन रांग तब्बल 4 किलोमीटरपर्यंत लांब गेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी 12 ते 15 तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.