ठाणे शहरात पावसाची संततधार सुरु असून कामवारी नदीपात्राचं पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर सायंकाळपर्यंत असाच कायम राहिल्यास नदीलगतच्या शहर व ग्रामीण भागातील म्हाडा कॉलनी, ईदगाह,शेलार या परिसरात पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.