कंचनताई गडकरी यांनी नागपूरला नितीन गडकरींची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हटले आहे. नागपूरला देशात अव्वल बनवण्याची नितीन गडकरींची जिद्द असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नागपूरच्या जनतेने भाजपला मतदान करावे, असे आवाहन कंचनताईंनी केले आहे. गडकरींचा राजकीय प्रवास नागपुरातूनच सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.