कांदिवलीतील पाच वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापलेल्या मनसेने भाजप पुरस्कृत गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा तीव्र निषेध केला आहे. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवत, पीडित मुलीवर उपचार सुरू असताना अशा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे.