गुजराती भाषेत नाव असल्याने विद्यापीठाची नोटीस. 2022 च्या नियमानुसार दर्शनीय भागात महाविद्यालयाचे नाव मराठीतच असावे असा नियम असताना कांदिवली येथील महाविद्यालयाने गुजराती भाषेत नाव लावलं आहे.युवासेना सिनेट सदस्यांनी केलेल्या तक्रारी नंतर तातडीने दखल घेऊन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने बालभारती मगनलाल जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स, कांदिवली यांना मराठी भाषेत दर्शनी भागात नाव लिहिण्याचे आदेश दिले आहेत.