धार्मिक वादानंतर राहुरी तालुक्यातील गुहा येथील ग्रामदैवत कानिफनाथ मंदिरात दोन्ही समाजांना वक्फ बोर्डाने कार्यक्रम घेण्यास स्थगिती देत मनाई केली होती. ही मनाई हायकोर्टाने उठवल्यानंतर कानिफनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. राजकीय टायमिंग साधत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डीले यांनी आरतीत सहभाग घेतला. तनपुरे आणि कर्डीले यांच्या हस्ते महाआरती पार पडली. प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डीले या दोघांनीही भगवी टोपी आणि भगवा पंचा घालत यात्रेत सहभाग घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आलंय.