कणकवली तालुक्यातील कलमठ येथील मंथन उकर्डे याने हॉंगकॉंग येथे झालेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये 6वे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटातून देशभरातून 2 खेळाडूंची निवड झाली होती. 12 वर्ष गटातून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंथनने आशियाई देशांच्या खेळाडूंमध्ये 6वा क्रमांक मिळवला. चेन्नई येथे एप्रिलमध्ये झालेल्या निवड चाचणीत मिनी एज ग्रुप 12 वर्ष गटात मंथनने प्रथम क्रमांक मिळवला होता. फेब्रुवारीत स्टेट चॅम्पियनशिपचे गोल्ड मेडलही त्याने जिंकले आहे.