कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे चार दिवस उरले आहेत. तहसीलदार कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित असून कडेकोट पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही पाळत आहे. भाजप विरुद्ध विरोधी पक्ष आणि मंत्री नितेश राणे विरुद्ध निलेश राणे अशी चुरस या निवडणुकीत दिसली. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे.