कणकवलीतील पालकमंत्रींकडून सामान्य कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे जनता, व्यापारी, व्यावसायिक संतप्त आहेत. या भ्रष्टाचारी राजवटीविरोधात कणकवलीकरांनी स्थानिक पातळीवर आघाडी केली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सहभागी होत असून, ही आघाडी आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल असे संकेत मिळत आहेत.