पायी वारीची 162 वर्षाची पंरपंरा असणाऱ्या कराड कोळे येथील संत घाडगेनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान झाले. कराडचे प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे पाटणचे प्रांत अधिकारी सोपान टोणपे यांच्या हस्ते विधीवत विणा उचलुन पायी दिंडीचे हरिनामाच्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली.