मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रॅकवर पाणी आलं, त्यामुळे ट्रॅकवरील खडी वाहून गेली. परिणामी पहाटेच्या सुमारास कर्जत-सीएसएमटी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. आताही लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.