कर्जत येथील रिसॉर्ट व्यवसायिकांना पाच दिवसापासून गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे अखेर पर्यटकांसाठी चुलीवरचे जेवण देण्याची वेळ हॉटेल व्यवसायिकांवर आणि रिसॉर्ट व्यवसायकांवर आली आहे. शनिवार आणि रविवार चाळीस हजाराहून अधिक पर्यटक कर्जत तालुक्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात