लोणावळ्यातील देवघर गावात कार्ला एकविरेच्या माहेर घरात भाऊ श्री काळभैरवनाथ मंदिराला यात्रेनिमित्ताने रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. उद्या कार्ला एकविरा देवी आणि तिचा भाऊ श्री काळभैरवनाथ यांची भेट होऊन चैत्र उत्सव साजरा केला जातो. मात्र त्यापूर्वी देवघरला श्री काळभैरवनाथ यांची पालखी निघून गाव प्रदक्षिणा पार पडते.