करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकरी सुरज बदे यांची विल्यस केळीच्या नावाखाली बनावट रोपे देऊन १५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पीक न आल्याने ते हतबल झाले आहेत. कृषी विभाग व पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.