पुणे आणि घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये दाखल झालेल्या पाण्याचे करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली (डिकसळ पूल) येथे बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या वनिता गुळवे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनीत पाणी दाखल झाले आहे.उजनी धरणात पाण्याचे आगमन झाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्वांनी जलपूजन करून चांगल्या पावसासाठी आणि समृद्ध शेतीसाठी प्रार्थना केली.