करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मोठ्या 150 कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यत कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.