कर्नाटक सीमावर्ती भागात मोठा पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव नदीला अचानक पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने देगलूर -उदगीर रस्त्यावरची वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. बोरगाव धडकनाळ जवळ नदीचे पाणी अचानक वाढले आहे.