कल्याण–डोंबिवलीत महायुतीतील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होताच शहराच्या राजकारणात चांगलाच उत्साह संचारला आहे. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या उमेदवारांनी ढोल–ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन करत निवडणूक प्रभाग कार्यालयांच्या दिशेने उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले.