कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विजयी झालेल्या उमेदवारांना आदित्य ठाकरे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संपूर्ण पॅनल विजयी झाला. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी महापौर वैजयंती ताई घोलप आणि तीन वेळा नगरसेवक असलेले संजय पाटील अश्या दिग्गज नगरसेवकांविरोधात लढून यश मिळवणाऱ्या ठाकरे गटाचे विजय उमेदवारांना आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल करत शुभेच्छा दिल्या.