नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील ग्रामदेवत श्री केतकेश्वर महाराज यात्रेला सुरुवात झाली. गावातून मानाच्या कावडी पारंपारिक वाद्यांसह, फटाक्यांच्या आतषबाजीसह तीन मजली लाकडी रथात शंकर महादेवाची मूर्ती ठेवून मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने भाविकांची हाताने ओढण्याची प्रथा आहे.