जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवाचं विजेतेपद पटकावलं आहे. गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन सन्मान करण्यात आला.