अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) याच्या हस्ते वांद्रे येथील एसआरए कार्यालयात पात्र नागरिकांना एसआरएच्या घरांच्या चाव्या वाटपाचा सोहळा झाला. एसआरए कार्यालयात सलमान खान याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी सलमानचा अंगरक्षक शेरा ( Shera ) देखील त्याच्या सोबत होता. सरकारी कर्मचारी देखील सलमानची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले होते. यावेळी अभिनेता सलमानच्या हस्ते काही पात्र नागरिकांना घरांची चावी वाटप करण्यात आले.