परभणीमधील पूर्णा तालुक्यातील खडाळा गावाला चक्री वादळाने झोडपलं आहे. गावातील अनेक घरावरील पत्रे उडाली असून संसार उपयोगी साहित्य, अन्न धान्य भिजल्याने संसार उघड्यावर आला आहे. चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार पंप उडाली आहेत. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.