पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मेंढपाळांना स्थलांतर करावे लागत असून मराठवाड्यातून आता मेंढपाळ चाऱ्यासाठी कोकणकडे सरकले आहेत. यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बसताना दिसत आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि पशुपालकांसमोर संकट उभे राहिले आहे.