बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपरिषदेच्या वतीने शहराला गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. परिणामी शहरात सर्वत्र आजार वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गेरू माटरगाव इथला ज्ञानगंगा प्रकल्प 100% भरला आहे. याच प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.