सध्या बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या तीव्र झळा मानवी जीवनावर जाणवत आहेत. अशा परिस्थितीत पशुपक्ष्यांवर याचा किती परिणाम होत असेल, याची जाणीव ठेवत मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील एका विद्यार्थिनीने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. इयत्ता सातवीत शिकणारी शितल राऊत हिने उन्हाळी सुट्टीत अभ्यासासोबतच पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला.