जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील खापरखेडा या गावातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातून वाट काढून शाळा गाठावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.