खारघर सेक्टर 20 येथील यश अव्हेन्यू सोसायटीत 2 लाख 13 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. जप्त केलेले पैसे भाजप उमेदवारांचे असून ते महापालिकेतील भ्रष्टाचारातून आले असल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच, दोन व्यक्ती 10 लाख रुपये घेऊन पसार झाल्याचेही ते म्हणाले. या घटनेमुळे पनवेल महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले आहे.