निफाड तालुक्यात संततधार पावसाने खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. लासलगावसह परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, मका पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिके सडण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.