छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने अखेर हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस लांबल्यामुळे अनेक दिवस चिंतेत असलेले शेतकरी आता पावसाच्या भरवशावर पेरणीचा जुगार खेळताना दिसत आहेत. काही भागांत शेतकऱ्यांनी लागवड आणि पेरणीला सुरुवात केली असून, आगामी काळात चांगला पाऊस होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.