मालेगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत, नांगरणी आणि पेरणीची कामे युद्धपातळीवर करत आहेत.