पावसाने दमदार हजेरी लावताच सह्याद्री पुन्हा एकदा हिरवाईने नटला आहे. डोंगर-दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील प्रसिद्ध झेनिथ धबधबाही आता प्रवाही झाला असून, मुंबई-पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांसाठी तो आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.