बुलढाणा जिल्हा कारागृहात मध्यरात्री चार फूट लांब कोब्रा साप निघाल्याने ड्युटीवर असलेल्या कारागृह पोलीस कर्मचारी आणि बंदिवानांमध्ये एकाच खळबळ उडाली. दरम्यान सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना बोलावून या कोब्रा नागाला पकडण्यात आले. कारागृह परिसरात चार फूट लांब कोब्रा नाग शिरल्याचे कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले असता इतरांनासुद्धा याची माहिती देण्यात आली. कारागृहात अनेक बंदिवान आहे. त्यामुळे तत्काळ सर्पमित्रांना बोलावण्यात आले होते..