भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) हल्ला चढवला आहे. किशोरी पेडणेकर यांना उबाठाने उमेदवार घोषित केल्याने, कोविड काळातील मुंबई महापालिकेतील दोन हजार कोटींच्या कथित घोटाळ्याला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. हा आरोप बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.