पतंगोत्सव म्हटला की येवलेकरांच्या मनात जणू काही उधाणाच येते. नववर्षाचे स्वागत पतंगोत्सवाने दरवर्षी साजरे केले जाते. येथील पतंगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गुजरात मधील सुरत,अहमदाबाद तसेच इंदौर भिवंडी या पतंगवेड्या शहरांमध्ये येवल्याची गणना केली जाते भोगी,संक्रांत आणि कर या तीन दिवशी येवल्यात पतंगोत्सव साजरा केला जातो.