दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनला दार्जिलिंगची हिमालयन रेल्वेही म्हटलं जातं. ही एका छोट्या मार्गावर चालवली जाते. पश्चिम बंगालच्या न्यू जलपायगुडी आणि दार्जिलिंगच्या दरम्यान ही ट्रेन चालवली जाते. पर्यटकांसाठीचं हे एक लोकप्रिय आकर्षण आहे.