छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे संरक्षण करण्यासाठी जे किल्ले बांधले होते. त्यापैकी राजकोट हा एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रामध्ये घुसलेल्या एका खडकावरच हा किल्ला बांधला होता. हा अभेद्य किल्ला पाहून मन भरून जातं. त्यामुळेच हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन येत असतात. या ठिकाणी नेहमी पर्यटकांची वर्दळ असते.