रत्नागिरी-लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीच्या अवकाळी पावसाने हापूस आंब्याचे मोठे नुकसान केले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या आंबा पीकावर संक्रांत. लांजा तालुक्यातील आरगाव, व्हेळ रिंगणे ,कुरंग ,विलवडे आणि वेरवली भागांमध्ये सलग दोन दिवस पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले.आधीच उत्पादन कमी, त्यात अवकाळी पावसानं आंबा बागायतदारांचे अधिकचे नुकसान.