मंगलमय वातावरणात कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला.जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पाडतो. वर्षातून एकदा नगरवासीयांची भेट घेण्यास आलेल्या देवीच्या दर्शनाचा हा शाही सोहळा हजारो भाविकांनी आपल्या नेत्रामध्ये आठवणरूपी साठवून ठेवला. अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडलेला देवीचा रथ गुजरी मार्गे भवानी मंडपात पोहचतो.. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिरापासून महाद्वार रोडला येऊन देवी पुन्हा मंदिरात जाते.