कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात, हाजगोळी ते माडवळे मार्गावर अस्वलांच्या एका जोडीचा रोमांचक व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. एका टेम्पो चालकाला चार दिवसांपूर्वी ही अस्वले धावताना दिसली. या 'रेस'चा थरारक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.