कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वांनाच आश्चर्य आणि कौतुकाचा धक्का दिला आहे. शांताबाई यादव यांच्या घरी पाळीव कुत्रीने शेळीच्या कमजोर पिलाला आपले दूध पाजून केवळ त्याचे प्राण वाचवले नाहीत, तर ममता आणि त्यागाची खरी शिकवण दिली आहे. जन्मापासून कमजोर आलेले हे शेळीचे पिल्लू आजवर कुत्रीचे दूध पिऊनच जिवंत राहिले आहे.