कबनूर येथे यंदा प्रथमच आपला देव आपली यात्रा या नावाने श्री हनुमान यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून ग्रामस्थांच्या सहभागातून ती अधिक भव्य आणि आकर्षक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.